Rashibhavishya : शुक्रवार, १३ डिसेंम्बर २०२४. मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी. हेमंत ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. प्रदोष
चंद्रनक्षत्र – भरणी(शुक्र)/ कृतिका (सूर्य). आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – हर्षल युती योग आहे. सकाळी तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. विनाकारण वाद टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. मात्र उत्तरार्ध खर्च वाढवणारा आहे.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. वाहन जपून चालवा. अपघाताचे भय आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. उत्तरार्ध यश देणारा आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. नावलौकिक वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.)
२० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. मित्र परिवार मोठा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. भोवतो ढोंगी मित्रांचे जाळे असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. वक्तृत्व आणि शब्दभांडार चांगले असते. आत्मविश्वास असू दुबळ्या लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521