Rashibhavishya : “आजचा राशी भविष्य: दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीला लाभदायक योग?”

A colorful and detailed Indian astrological artwork showcasing zodiac signs arranged in a circular pattern with bright, traditional hues. At the center, an artistic depiction of Lord Dattatreya is surrounded by celestial elements like stars and the moon. The background features intricate mandala designs, adding a spiritual and cosmic essence. The image is illuminated with a soft divine glow, creating a festive and serene atmosphere.

Rashibhavishya : शनिवार, १४ डिसेंम्बर २०२४.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी. दक्षिणायन, क्रोधी नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे” श्री दत्तात्रेय जयंती

नक्षत्र: रोहिणी (चंद्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृषभ.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी लाभ योग, आणि शुक्राशी त्रिकोण शुभ योग तर गुरुशी युती आहे. मन प्रसन्न राहील. काव्य- शास्त्र- विनोद यात दिवस व्यतीत होईल. वक्तृत्व गाजेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. अर्थकारण सुधारेल. सर्वांना खुश कराल. आनंद मिळेल. खर्च वाढेल. महत्वाचे सल्ले मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अत्यंत अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील. धार्मिक कार्य घडेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक लाभ होतील. आनंदी रहाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. चतुर्थ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.)

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521