रतन टाटा ICU मध्ये दाखल: ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा (Ratan tata Breach Candy Hospital chya ICU mahye : Upchar suru)

Indian Business Icon Ratan Tata

मुंबई: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata)यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रतन टाटा हे देशातील एक अग्रगण्य उद्योगपती असून त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या आरोग्याच्या बातमीने देशभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, रुग्णालयातून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

रतन टाटा यांच्या तब्येतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी देखील रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.

रतन टाटा यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होईल, अशी अपेक्षा देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply