नववर्षात ई-केवायसी kyc अपूर्ण लाभार्थ्यांचे रेशन Ration होणार बंद!
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक: जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारने रेशन Ration धान्य वितरण प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना त्यांचे रेशनकार्ड आधार आणि मोबाइल नंबरशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात ८ लाख ७४ हजार ४०१ रेशनकार्डधारक आहेत, त्यापैकी सुमारे ९६ टक्के रेशनकार्डधारकांचे मोबाइल क्रमांक लिंक करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही ४५ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे त्यांचा धान्यपुरवठा नववर्षात थांबण्याची शक्यता आहे.
Ration ई-केवायसी प्रक्रिया का आहे महत्त्वाची?
ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल क्रमांक त्यांच्या रेशनकार्डशी जोडले जातात. यामुळे धान्य वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक होत आहे. तसेच, लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळावे यासाठी रेशन वितरणाची माहिती मोबाइलवर मेसेजद्वारे पाठवली जाते.
तालुकानिहाय रेशनकार्डधारकांची संख्या:
नाशिक शहर: १,०७,५४४,मालेगाव: ६७,६१७,निफाड: ७८,३८५,सिन्नर: ५१,२७०,त्र्यंबकेश्वर: २४,०३७
४५ हजार लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असून, त्यावर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून रेशनपुरवठा सुरू ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जर तुमचे रेशनकार्ड मोबाइल नंबरशी अद्याप लिंक झालेले नसेल किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, त्वरित आपल्या तालुक्यातील रेशन कार्यालयाशी संपर्क साधा. नववर्षात तुमचा धान्यपुरवठा थांबण्यापासून वाचवा!