“सत्ताधारी आणि निषेधकर्ते? उड्या मारून प्रायश्चित्त घ्या – राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा”

toll-exemption-political-reactions-ramdas-kadam-vs-raj-thackeray

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंत्रालयात आदिवासी आमदारांनी केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. धनगर आरक्षण, पेसा भरती यांसारख्या मागण्यांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवरून उड्या मारून आंदोलन केले . राज ठाकरे यांनी या त्यांच्या ह्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे . सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ?

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या आंदोलनाचा चांगला समाचार घेतला आहे.

सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.

त्यांनी या या आमदारांनी केलेल्या आंदोलनावर जोरदार टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाल्याचे म्हटले आणि जनतेला आवाहन केले की, आगामी निवडणुकांमध्ये अशा सत्ताधाऱ्यांना धडा शिकवावा.

यामध्ये राज ठाकरे यांनी जणू सत्ताधाऱ्यांच्या ढोंगी वागणुकीचा पर्दाफाश करत लोकांच्या मनातील अस्वस्थतेला वाचा फोडली आहे.

Leave a Reply