Sant Kabir Nagar murder case : नाशिकमध्ये गुन्हेगारी पुन्हा उफाळली: संत कबीर नगरमध्ये युवकाचा धारदार शस्त्रांनी खून

Nashik latest crime updates

गुन्हेगारीची छटा पुन्हा दिसू लागली, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Sant Kabir Nagar murder case : नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शनिवारी रात्री (दि. 8 मार्च) संत कबीर नगर रस्त्यावर एका 29 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Sant Kabir Nagar murder case)

टोळक्याचा हल्ला : जुन्या वादातून तरुणाचा जीव गेला

मृत युवकाचे नाव अरुण राम बंडी (वय 29) असून, तो रात्री संत कबीर नगर परिसरात आला असता, सातपूर येथील कामगार नगरमधील टोळक्याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर हल्ला केला.
धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात अरुणचा जागीच मृत्यू झाला.

Sant Kabir Nagar murder case

हल्लेखोर घटनास्थळावरून फरार, स्थानिकांचा रोष

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी अरुणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी हल्लेखोरांच्या दोन दुचाकींची तोडफोड केली.

पोलीस यंत्रणा सतर्क : तिघे आरोपी अटकेत, दोन फरार (Sant Kabir Nagar murder case)

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दंगल नियंत्रण पथक देखील पाचारण करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण

मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. सरकारवाडा पोलीस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.

खुनाचा गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु

गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, तर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय झाले आहे.