Shevgaon : किडनॅपिंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपी २४ तासांत गजाआड

Shevgaon police arrest boy

Shevgaon news:शेवगाव शहरातील सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना शेवगाव पोलीसांनी २४ तासांत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या पथकाने तातडीने तपास करून आरोपींना मोटरसायकलसह पैठण तालुका, संभाजीनगर येथून पकडले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

प्रकरणाचे तपशील:
२५ डिसेंबर रोजी, नाईकवाडी मोहल्ल्यातील एका सात वर्षीय मुलाला मिरी रोडवरील पेट्रोल पंपावरून सलमान इनामदार आणि एका अल्पवयीन साथीदाराने बळजबरीने मोटरसायकल (एमएच १६ २०००) वरून पळवून नेले. ढोरजळगाव येथे मुलाला मारहाण करून त्याला “हे कोणाला सांगू नको” अशी धमकी देत सोडून ते पसार झाले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि तातडीने कारवाई करत त्यांना अटक केली.

सदर कारवाई:
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

He Pan Wacha: नाशिक महानगरपालिका: आयुक्त मनिषा खत्री यांच्या बैठकीत शहर विकासावर भर