नाशिक (Simhastha Kumbh Mela 2027): येत्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारणीस गती मिळाली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने ३०५६ कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील देत सर्व विभागांना मार्च २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. विभागीय आयुक्त आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी अंमलबजावणीसाठी कडक सूचना दिल्या आहेत.
पूर्वी १ हजार कोटींच्या निधीवर मर्यादित राहिलेल्या कामांऐवजी, आता साधारण तिप्पट निधीसह नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या मागणीनुसार पहिल्या टप्प्यातील कामांची रक्कम २३६८ कोटी होती, मात्र मंजुरी फक्त १२०० कोटींना मिळाली होती.
सिंहस्थ २०२७ साठी मंजूर व प्रस्तावित कामे
महापालिका प्रकल्प
- मुकणे पाणीपुरवठा योजना: ₹१२५ कोटी
- रस्ते: ₹३६० कोटी
- पूल: ₹२५ कोटी
- ऑप्टिकल फायबर केबल: ₹६० कोटी
- मलनिस्सारण व्यवस्था: ₹६६६ कोटी
- साधुग्राम भूसंपादन: ₹१०५० कोटी
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ: ₹१५ कोटी
- जलकुंभ: ₹२ कोटी
- अग्निशमन विभाग: ₹५ कोटी
एकूण आराखडा: ₹३२७७ कोटी | मंजूर: ₹१२०० कोटी
इतर विभागांची कामे (Simhastha Kumbh Mela 2027)
- जलसंपदा विभाग घाट व बंधारे: ₹२४४ कोटी (मंजूर ₹३६ कोटी)
- त्र्यंबकेश्वर घाट बंधारे: ₹११५ कोटी (मंजूर ₹१७ कोटी)
- त्र्यंबकेश्वर वॉटर ग्रीड: ₹२८१ कोटी (मंजूर ₹११३ कोटी)
- वाढीव पाणीपुरवठा योजना: ₹६४ कोटी (मंजूर ₹१६ कोटी)
- काँक्रीट रस्ते: ₹८२ कोटी (मंजूर ₹२७ कोटी)
- घनकचरा व्यवस्थापन केंद्र: ₹१६ कोटी (मंजूर ₹५ कोटी)
- त्र्यंबकेश्वर नगरपालिका: ₹१८२ कोटी (मंजूर ₹९० कोटी)
- परिवहन महामंडळ: ₹९० कोटी (मंजूर ₹७७ कोटी)
- राज्य पुरातत्त्व विभाग: ₹१४१ कोटी (मंजूर ₹४४ कोटी)
- महाराष्ट्र वीज वितरण कंपनी: ₹७३ कोटी (पूर्ण मंजूर)
- नाशिक पोलिस: ₹२० कोटी (मंजूर ₹७ कोटी)
- कुंभमेळा कार्यालयीन व इतर खर्च: ₹१२ कोटी
कामे वेळेत पूर्ण न केल्यास जबाबदारी
प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, एप्रिल २०२७ पर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.