steel price drop नाशिकमध्ये स्टीलचे दर सुमारे ५ हजार रुपयांनी कमी झाले आहेत, ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात गती आली आहे. सध्या अधिक उत्पादन आणि स्थिर मागणीमुळे स्टीलच्या किमतीत घट झाल्याचे दिसते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक – गेल्या तीन ते चार महिन्यांपासून स्टीलच्या किमतीत मोठी घट झाली आहे. प्रति टन स्टीलचे दर सुमारे ५ हजार रुपयांनी कमी झाले असून, याचा फायदा थेट बांधकाम क्षेत्राला होत आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
बांधकाम क्षेत्राला ‘बूस्ट’!
बांधकाम प्रकल्पांसाठी स्टील आणि सिमेंट ही मूलभूत सामग्री महत्त्वाची असते. मात्र, त्यांच्या किमती स्थिर नसल्याने प्रकल्प खर्चावर मोठा परिणाम होतो. स्टीलच्या घसरलेल्या किमतीमुळे नव्या आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे.
दर घटण्यामागील कारणे (steel price drop)
▶ अधिक उत्पादन, स्थिर मागणी – जालना, वर्धा आणि नाशिक येथील स्टील उत्पादक कंपन्यांनी उत्पादन वाढवले आहे. मात्र, मागणी स्थिर राहिल्याने बाजारात पुरवठा अधिक झाला आणि किमती कमी झाल्या.
▶ सध्याचा दर: स्टीलचा दर ६२ हजारांवरून ५६ ते ५७ हजार प्रति टन या पातळीवर आला आहे.
दर पुन्हा वाढणार का?
स्टीलचे दर सतत चढ-उतार होत असतात. सध्या किमती घसरल्याने बांधकाम व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील काही महिन्यांत मागणी वाढल्यास दर पुन्हा वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
घरांच्या किमतीवर परिणाम?
बांधकाम खर्च काही प्रमाणात कमी झाल्याने घरांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकमध्ये वन बीएचके फ्लॅटची किंमत २० लाखांपेक्षा जास्तच असल्याने मोठ्या प्रमाणावर घसरलेली किमतीची अपेक्षा करणे कठीण आहे.