लोणी/अहिल्यानगर – संगमनेर मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. संकल्प सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत सुजय विखे यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सुजय विखे यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली, त्यावरून मला जिवे मारण्याचा कट रचला गेला होता. ते पुढे म्हणाले, घटनेनंतर आम्ही जाणाऱ्या रस्त्यावर अनेक लोक रॉकेल आणि पेट्रोल घेऊन तयार होते. गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या, काही गाड्या जाळल्या गेल्या आहे.
सुजय विखे यांनी या हिंसक प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. कायदेशीर कारवाई केली जावी. अशा वक्तव्य करणाऱ्याला महायुती किंवा विखे पाटील परिवार पाठीशी घालणार नाही.” त्यांनी घटनेचे सर्व व्हिडिओ फुटेज निवडणूक आयोगाकडे सादर करून कारवाईची मागणी करण्याचे जाहीर केले.