Swine Flu death Nashik : नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोकादायक उद्रेक : दुर्लक्ष प्राणघातक, जागरूकता जीवनदायी!

Swine Flu death Nashik :

महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क, स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी विशेष बैठक

Swine Flu death Nashik : शहरात डेंग्यूनंतर आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव Swine Flu death Nashik वाढू लागला आहे. सिडको परिसरातील एका ५२ वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी (१६ एप्रिल) विशेष आरोग्य बैठक घेण्यात आली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


हवामान बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले

सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, घसादुखी यासारख्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


तातडीने तपासणी करा : लक्षणांकडे दुर्लक्ष नको

स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणे :

  • ताप (१०२-१०३ डिग्री)
  • थंडी वाजणे
  • कफ व घसादुखी
  • अंगदुखी, डोकेदुखी
  • अत्याधिक थकवा
  • डायरिया, उलट्या

स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांमध्ये न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस यासारख्या गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये धोका अधिक वाढतो.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळील रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.


आरोग्य विभागाची बैठक आणि निर्णय

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जीवशास्त्रज्ञ डॉ. नितीन रावते आदी उपस्थित होते. बैठकीत स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.