Todays Prediction, 4 March 2025 : मेष राशी होणार मालामाल तर कन्या राशीला येणार विवाह प्रस्ताव …तुमच्या राशीत काय आहे जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Today's Prediction, 4 March 2025: Aries will become wealthy, while Virgo will receive a marriage proposal... Know what your zodiac sign has in store for you today.

मंगळवार, ४ मार्च २०२५. फाल्गुन शुक्ल पंचमी/षष्ठी , वसंत ऋतू, उत्तरायण. क्रोधीनाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

आज चांगला दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – भरणी(शुक्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. ( एन्द्र योग शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – लाभ मंगळ, रवी, शनी. तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल रवी, शनी प्रगतीस पोषक आहेत. राजकारणात गती मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
व्यय स्थानी चंद्र आहे. जबाबदारी वाढेल. कठोर बोलणे होईल. शब्दास मान मिळेल. वरिष्ठ खुश राहतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. शत्रूभय जाणवेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. आरोग्य मात्र सांभाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) राशीस्वामी सप्तमात आहे. प्रगतीचा दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. शत्रू ला असमान दाखवाल. प्रशासकीय कामे पार पडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती होणार आहे. षष्ठ रवी, शनी तुम्हाला आर्थिक भरभराटआणि विजयश्री देईन.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. परदेश गमन होईल. दबदबा वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मानसिक समाधान लाभेल. कटू आठवणी विसरणे हिताचे आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज आर्थिक प्रगती होईल. शेअर्स/लॉटरी मधून लाभ होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम आर्थिक यश मिळेल. संतती कडून चांगली बातमी येईल. दैवी उपासना चालू ठेवा. अन्यथा अनामिक भय दाटून येईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे. स्थिर स्थावर होण्यासाठी चांगला कालावधी आहे. खर्च मात्र वाढणार आहे.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)