त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा : श्रावण सोमवारसाठी वाहतूक नियोजन, खंबाळे-पहिनेत पार्किंगची व्यवस्था

download 73

नाशिक | ८ ऑगस्ट २०२५: (त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा) तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी खंबाळे आणि पहिने येथे वाहन व एस.टी. बसेससाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गदर्शन

  • शहर वाहतूक पोलिसांचा निर्णय: सीबीएस ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतचा रस्ता एस.टी. बस वगळता सर्व वाहनांसाठी बंद राहील.
  • ग्रामीण पोलिसांची पार्किंग योजना:
    • त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने खंबाळे, पहिने, अंबोली, तळवाडे येथे थांबवली जातील.
    • येथून पुढे भाविकांसाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध असेल.
  • पर्यायी मार्ग:
    • पालघरकडे जाणारी वाहने सातपूर-गोवर्धनमार्गे गिरणारे, वाघेरा फाटा, अंबोली टी-पॉइंटमार्गे जव्हार-पालघरला जातील.
    • घोटी-वाडीव-हे मार्गे जाणारी वाहने याच मार्गाचा वापर करतील.

बंदोबस्ताची माहिती (त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा)

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल:

  • उपविभागीय अधिकारी
  • निरीक्षक
  • १० उपनिरीक्षक
  • १५० अंमलदार
  • ५० महिला अंमलदार
  • १०० होमगार्ड