Trimbakeshwar Darshan | Trimbakeshwar Temple | Shravan Monday Crowd
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) Trimbakeshwar Shravan News: श्रावण महिन्याच्या (Shravan Month) दुसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराजाच्या (Trimbakraj Temple) दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
रविवारी रात्रीपासूनच भाविक ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा (Brahmagiri Parikrama) करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. भाविकांनी कुशावर्त कुंडावर (Kushavart Kund) पवित्र स्नान करून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून गेला.
प्रदक्षिणा मार्गावर गर्दीचा उच्चांक (Trimbakeshwar Shravan News)
दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या (Shravan Somwar 2025) दिवशीच भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने प्रशासनाचा अंदाज चुकला. प्रदक्षिणा मार्गावर रात्रीपासून भाविकांची गर्दी असून, काही भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण करून परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे कुशावर्त कुंडावर स्नानासाठी देखील मोठी रांग पाहायला मिळाली.
वाहनांची कोंडी; खासगी वाहनांना प्रवेशबंदी
संत निवृत्तीनाथ मंदिर, मुख्य रस्ता (Main Road), आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने खासगी वाहनांना (Private Vehicles) मंदिर परिसरात प्रवेश नाकारला आहे. परिणामी, गजानन महाराज संस्थान ते प्रदक्षिणा मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
प्रशासन सतर्क; पुढील सोमवारसाठी तयारी सुरु
गर्दीचा अंदाज लागल्यावर प्रशासनाने (Trimbakeshwar Administration) अलर्ट मोडमध्ये काम सुरू केले आहे. येणाऱ्या तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत अधिक बळकटी आणण्यावर भर दिला जात आहे.