8 April: Anti-North Indian hate speech
: सुप्रीम कोर्टात राज ठाकरे आणि मनसेविरोधात याचिका; पक्ष मान्यता रद्द करण्याची मागणी

Anti-North Indian hate speech

MNS Party Recognition Under Threat After Hate Speech Allegations

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Anti-North Indian hate speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना या पक्षाचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली असून, राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात तिरस्कार आणि हिंसा पसरवत आहेत (Anti-North Indian hate speech), असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मनसेची राजकीय मान्यता रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मनसे कार्यकर्त्यांवर हल्ल्याचे आणि धमकीचे आरोप (Anti-North Indian hate speech)

सुनील शुक्ला यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. इतकंच नव्हे तर, फोन कॉल आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्या गेल्या, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत केली आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीर कारवाईची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

मनसेचा भाजपवर थेट आरोप: “हे भाजपचं षडयंत्र” (Anti-North Indian hate speech)

या याचिकेनंतर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “प्रादेशिक पक्ष वाढू नयेत म्हणून हे भाजपचे षडयंत्र आहे.” याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने असे आरोप केले होते. आता राज ठाकरे यांची मनसे देखील अशाच स्वरात बोलताना दिसत आहे.

भाजपकडून आरोप फेटाळले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र मनसेचे आरोप फेटाळले असून, “भाजप अशा प्रकारचं राजकारण करत नाही,” असे स्पष्ट केले.

संजय निरुपम यांची टीका: “मनसेची गुंडगिरी थांबवावी”

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील मनसेवर टीका करताना सांगितले, “मराठी भाषेचा आग्रह ठेवण्यात गैर नाही, पण हिंसेच्या मार्गावरून आंदोलन करणे चुकीचे आहे.” तसेच, “शहरात नवीन आलेल्यांवर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आता कोर्टाच्या निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,” असे ते म्हणाले.

मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी वाद पुन्हा पेटला

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी वाद अधिक चिघळलेला दिसतो आहे. काही ठिकाणी हिंदी बोलण्यावर बंदी घालण्याचे प्रकार समोर आले आहेत, तर मराठी भाषिकांना नोकरीतून डावलण्याचे आरोप वाढले आहेत. यावरून गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनीही सामाजिक संघर्षाचा इशारा दिला होता.