Liquor Smuggling : चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावर ५० लाखांच्या अवैध विदेशी मद्यसाठ्यासह आयशर ट्रक जप्त, एक अटकेत

LiquorSmuggling

चांदवड (नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावर अवैधरीत्या विदेशी मद्याची तस्करी (Liquor Smuggling) करणारा आयशर ट्रक सोग्रस (ता. चांदवड) येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने पकडला. या कारवाईत ५० लाख ८७ हजार ८४० रुपये किमतीच्या ४०८ बॉक्स विदेशी दारूसह एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. भरारी पथकाचे निरीक्षक रियाज खान यांनी ही माहिती दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Liquor Smuggling : राज्य उत्पादन शुल्काची यशस्वी कारवाई

राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला दादरा नगर हवेली व दिव दमण येथेच विक्रीस असलेला मद्यसाठा (Liquor Smuggling) मुंबई-आग्रा महामार्गाने अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोग्रस येथे सापळा रचला आणि संशयास्पद आयशर ट्रकला थांबवले. झडती दरम्यान, वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा आढळून आला.

पोलिस कोठडी, आंतरराज्यीय टोळीचा तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या अप्सरुद्दिन मसिउद्दिन खानने हा साठा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरे येथे जात असल्याची कबुली दिली. चांदवड न्यायालयाने संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास निरीक्षक रियाज खान करीत आहेत.

भरारी पथकाची तुकडी

या कारवाईत निरीक्षक रियाज खान यांच्यासह दुय्यम निरीक्षक आर. जी. जाधव, जवान रूपेश काळे, वैभव माने, गणेश पडवळे, राजाराम सोनवणे, चांदवडचे गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक दिलीप महाले आदींचा समावेश होता.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाढलेली अवैध वाहतूक

मुंबई-आग्रा महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने अवैध दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता वाढवली असून, अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येत आहेत.

ही कारवाई अवैध मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी मोठा धक्का असून, उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखला गेला आहे. पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

#NashikCrime #IllegalLiquor #ChandwadNews #ExciseDeptAction #MumbaiAgraHighway #LiquorSmuggling