Rashibhavishya : “२० ऑक्टोबर: भाग्योदय, चंद्राचा प्रभाव की विरोधाभासी व्यक्तिमत्व?”

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

२० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

 तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय समुद्र, नदी किंवा पाणथळ जागी होतो. मित्रपरिवार मोठा असतो. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुम्ही नेहमी सावध असतात मात्र प्रेमात कोणतीही पातळी ओलांडण्यास तयार असतात. तुमचाविवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला मदत मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा आहे. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे भेदभाव करू शकतात. तुम्ही कल्पनारम्य आणि उत्साही आहात तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील आहात. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. तुम्ही विनम्र असून इतरांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्ही अतिशय हळवे असून फार लवकर मनातून अस्वस्थ होतात. तुम्हाला कोडे सोडवणे, लॉटरी यांचा नाद असतो. तुमच्याजवळ चांगले शब्दभांडार असते. बोलणे, लेखन, भाषण, शिकवणे यात तुमचा हातखंडा असतो. दुर्बल लोकांना मदत करणे तुम्हाला आवडते. भोवती ढोंगी मित्रांचे जाळे असते.

व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय क्षेत्र, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

रविवार, २० ऑक्टोबर २०२४. अश्विन कृष्ण तृतीया/चतुर्थी. शरद ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज वर्ज्य दिवस/क्षय तिथी आहे” संकष्टी चतुर्थी चंद्र उदय (मुंबई) ८.३४. नाशिक – ८.२८

चंद्रनक्षत्र – कृतिका (सूर्य)/रोहिणी (चंद्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सन्मान मिळतील. आध्यत्मिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. नोकरीत काहीसा तणाव जाणवेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. प्रवासचे नियोजन बदलेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. शनीची नाराजी जाणवेल. श्री. हनुमान उपासना करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. कनिष्ठ मात्र नाराज राहतील.पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. मात्र येणी येण्यास विलंब लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल. वाहन जपून चालवा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल. विक्री क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. प्रगतीत काही अडथळे जाणवतील.

कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521