छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रवेशित विद्यार्थ्यांना वस्तीगृह मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी आज आक्रमक आंदोलन केले. वेळोवेळी निवेदन आणि आंदोलने करूनही विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी आज अचानक आक्रमक पवित्रा घेत कुलगुरूंच्या गाडीला घेराव घातला आणि गाडी अडवली.सुमारे चार वाजल्यापासून विद्यार्थी कुलगुरूंच्या दालनात उपस्थित होते, परंतु कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास टाळाटाळ केली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या गाडीसमोर येऊन गाडी अडवली. विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनातील कर्मचारी यांच्यातील तणावपूर्ण स्थितीत पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला, परंतु विद्यार्थी गाडी सोडण्यास तयार नव्हते.शेवटी, विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेपुढे झुकत कुलगुरूंना गाडीतून उतरावे लागले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या चर्चेत विद्यार्थ्यांनी वस्तीगृहाची मागणी पुन्हा जोरकसपणे मांडली. विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.