नाशिक: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या राजकीय वाटचालीत मोठी उलथापालथ सुरू आहे. तब्बल दीड महिना उलटल्यानंतरही त्यांनी संघर्षाचा पवित्रा कायम ठेवत, राज्यपाल पद नाकारले आहे. भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे आहे. मी गोरगरिबांसाठी, भटक्या-विमुक्तांसाठी आणि ओबीसी हक्कांसाठी लढत राहणार आहे.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, समर्थकांमध्ये नाराजी
राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्थान मिळाले नाही. यानंतर राज्यभरात भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. समता परिषदेच्या मेळाव्यांतून आंदोलने, संतप्त प्रतिक्रिया दिसून आल्या. शिर्डीच्या पक्षीय मेळाव्यात भुजबळ यांची अल्पकाळ उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.
भुजबळांचा संघर्षपथ स्पष्ट
राज्यपाल पदाचा सन्मान राखत भुजबळ यांनी हे पद नाकारले असले तरी, त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. “माझे ध्येय सामाजिक न्याय व ओबीसी नेतृत्व बळकट करणे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात भुजबळ यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.