CM Eknath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

cm-eknath-shinde-kurla-development-projects-inauguration

Latest News : राज्य शासन विविध समाजघटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवत आहे. महिलांसाठी विशेषतः “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,” “लेक लाडकी योजना,” आणि “मोफत उच्च शिक्षण योजना” सारख्या उपक्रमांचा समावेश आहे, ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन साधता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करताना हे विचार मांडले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कुर्ला येथील बंटर भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते, त्यावेळी आमदार मंगेश कुडाळकर व माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र उद्योग आणि परकीय गुंतवणुकीत देशातील आघाडीवर आहे. महिला, शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या विविध घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी होत आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” साठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालेले काही महत्वाचे प्रकल्प:

  1. छेडा नगर उड्डाण पुलाचे लोकार्पण
  2. पूर्व द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर ते यु-टर्न पुलाचे भूमिपूजन
  3. चुनाभट्टी रेल्वे फाटकावरील प्रस्तावित पुलाचे भूमिपूजन
  4. कुर्ला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे लोकार्पण
  5. चुनाभट्टी प्रवेशद्वार व इतर कामांचे लोकार्पण
  6. कामराज क्रीडांगण सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
  7. टिळक नगर हनुमान मंदिर उद्यान नूतनीकरण
  8. नेहरूनगर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील नाना नानी पार्क व बालोद्यान सुशोभीकरण
  9. कुर्ला विधानसभेतील सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांचे काम
  10. नेहरूनगर व टिळक नगर म्हाडा वसाहतीमधील नूतनीकरण प्रकल्प
  11. कुर्ला पूर्व बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” याचे लोकार्पण

या प्रकल्पांमुळे कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना गती मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply