मुंबई: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन माधवराव फड यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हॉस्पिटलला भेट देऊन मोहन माधवराव फड यांची प्रकृतीची विचारपूस केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहन फड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करत त्यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली आणि उपचारांसंदर्भातही चौकशी केली. “मोहन फड जी लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांची प्रकृती लवकरच पूर्ववत होईल, असा मला विश्वास आहे,” असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मोहन माधवराव फड हे नाशिक जिल्ह्यातील अत्यंत ज्येष्ठ नेते असून, त्यांनी अनेक वर्षे भाजपच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि पुन्हा कार्यक्षम होऊन जनतेच्या सेवेसाठी तत्पर व्हावेत, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मोहन फड यांच्या प्रकृतीसंबंधित अधिकृतरीत्या कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी प्रार्थना केली आहे.