फैजल पोपेरे यांना संधी देत मनसेची चाल: श्रीवर्धनमध्ये तटकरे यांच्यासमोर नवा आव्हान

toll-exemption-political-reactions-ramdas-kadam-vs-raj-thackeray

मनसेने आपल्या विधानसभेच्या पाचव्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून फैजल पोपेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फैजल पोपेरे हे दांडगा जनसंपर्क असलेले, सर्वपरिचित तरुण नेते आहेत, आणि त्यांनी अनेक वर्षांपासून मनसेच्या विचारधारेवर निष्ठा राखली आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे श्रीवर्धनमध्ये राजकीय रंगमंचावर मोठी लढत होण्याची चिन्हं आहेत.फैजल पोपेरे विरुद्ध आदिती तटकरे: श्रीवर्धनमध्ये जोरदार सामनाफैजल पोपेरे यांची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बलाढ्य नेत्या आदिती तटकरे यांच्याशी होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना भाजपसोबत युतीमुळे मुस्लिम मतदारांचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांनाही तशाच फटक्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीवर्धन मतदारसंघात 35 हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत, आणि त्यांच्या मतांची दिशा निकालावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकू शकते.मनसेने फैजल पोपेरे यांना उमेदवारी देत मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरित चित्र आहे. राज ठाकरे यांनी भाजपविरोधातील मुस्लिम मतदारांची मते खेचण्यासाठी ही ‘गुगली’ टाकली असल्याचं बोललं जातं. आता मुस्लिम मतदार कोणाला पसंती देतात आणि त्यांच्या मतदानाचा प्रभाव कोणाच्या बाजूला राहतो, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.