India Economy Growth : भारत लवकरच बनेल जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था! जर्मनी आणि जपान मागे पडणार?

India Economy Growth

भारताची अर्थव्यवस्था नवे उच्चांक गाठणार

India Economy Growth: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, लवकरच तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आर्थिक महासत्ता बनू शकतो. जर्मनी आणि जपानच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे भारताला अपेक्षेपेक्षा लवकर हा ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी मिळणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

IMF चा अंदाज – २०२९ पर्यंत भारत तिसऱ्या क्रमांकावर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालानुसार, २०२९ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ६.४४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्या वेळी जर्मनी (५.३६ ट्रिलियन डॉलर) चौथ्या स्थानावर आणि जपान (४.९४ ट्रिलियन डॉलर) पाचव्या स्थानावर असेल.

जर्मनी आणि जपानची अर्थव्यवस्था संकटात

सध्या भारत ४.२७ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह पाचव्या स्थानावर आहे. परंतु जर्मनी आणि जपानच्या अर्थव्यवस्थेत वाढीचा वेग मंदावल्यामुळे भारताला लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.

जर्मनीची अर्थव्यवस्था घटतेय

  • जर्मन अर्थव्यवस्था २०२३ मध्ये ०.३% घसरली, तर २०२४ मध्ये ०.२% घट झाली.
  • २०२५ मध्येही ०.५% घसरण होण्याचा अंदाज आहे.

जपानची वाढही मंदावली

  • जपानच्या अर्थव्यवस्थेची वाढ १.१% दराने होण्याची अपेक्षा आहे.
  • तुलनेत भारताची अर्थव्यवस्था ६.५% दराने वाढण्याचा अंदाज आहे.

भारताची अर्थव्यवस्था – भविष्यातील महासत्ता?

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. मजबूत निर्यात, उत्पादन क्षेत्रातील वाढ, डिजिटल क्रांती आणि गुंतवणुकीच्या संधींमुळे भारताची अर्थव्यवस्था भविष्यातील महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जर सर्व काही सुरळीत राहिले, तर भारत २०२४-२५ मध्येच जर्मनी आणि जपानला मागे टाकू शकतो. त्यामुळे भारताची आर्थिक शक्ती वाढत आहे आणि येत्या काही वर्षांत तो जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची पूर्ण शक्यता आहे.