Jamnagar : जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकांचे लोकार्पण

Jamnagar Smarak

latest News : जळगाव: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण व गौरव करण्यासाठी जामनेर येथे “शिवसृष्टी” आणि “भीमसृष्टी” या दोन भव्य स्मारकांचे उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या भाषणातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून त्यांचे कार्य आणि विचार हे आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.” शिवाजी महाराजांनी दिलेले स्वराज्याचे स्वप्न आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्वाचे विचार आजच्या पिढीला महत्त्वाचे दिशादर्शन करतात. “जामनेर शहरात निर्माण झालेली शिवसृष्टी आणि भीमसृष्टी ही स्मारके केवळ भव्यच नाहीत, तर या दोन युगपुरुषांच्या कार्याचे जिवंत स्मारक म्हणून उभी राहिली आहेत,” असे फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी शिवसृष्टीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करताना सांगितले की, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत 16 फूट उंचीचा भव्य ब्रांझ धातुचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच, रायगड किल्ल्याच्या नगारखानासहित भव्य वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. “350 व्या राज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून त्यांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही शिवसृष्टी निर्माण केली आहे,” असे ते म्हणाले.

भीमसृष्टीच्या संदर्भात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 15 फूट उंचीची संविधान घेतलेली मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारी आहे. “भीमसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या 24 उपाध्यांचे वर्णन स्टील प्लेट्सवर साकारले असून, त्यामागे बोधिवृक्ष आणि संविधान चक्राचे प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जामनेरच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. “जामनेर तालुक्याचा वेगाने होणारा विकास आणि या दोन भव्य स्मारकांचे निर्माण हे स्थानिक लोकांसाठी अभिमानास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जामनेरवासीयांचे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाले आहे.” त्यांनी पुढील काही दिवसांत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप आणि इतर महापुरुषांचे स्मारकं उभारणार असल्याचेही घोषित केले.

कार्यक्रमात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही शिवसृष्टी आणि भीमसृष्टीच्या भव्यतेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्याची प्रशंसा करत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

11 1 min

शिवसृष्टी:
या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 16 फूट उंचीचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा आणि रायगडाच्या नगारखानासह वाड्याची प्रतिकृती आहे. वाड्याच्या लांबी 100 फूट असून त्यात 12 खांब तळमजल्यावर आणि 24 खांब पहिल्या मजल्यावर आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी 50 फूट आणि तटबंदी धरून उंची 38 फूट आहे.

12 2 min

भीमसृष्टी:
भीमसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 15 फूट उंचीचा संविधान घेतलेला पुतळा उभारला आहे. त्यांच्या 24 उपाध्या स्टील प्लेट्सवर कोरल्या आहेत. मूर्तीमागे बोधिवृक्ष आणि संविधान चक्राच्या प्रतीकांचे प्रतिकृतीकरण करण्यात आले आहे.

हा सोहळा जामनेरकरांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला असून या स्मारकांच्या निर्मितीमुळे स्थानिक लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply