नाशिकः नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी सलग दुसऱ्या दिवशी रामकुंड व पंचवटी परिसराची पहाणी करून आगामी सिंहस्थ कुंभमेळा Kumbhmela आणि नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी दिशा ठरवली. आज सकाळी या पहाणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पहाणी दौऱ्यात मनिषा खत्री यांनी गोदावरी नदीकाठ परिसरातील अहिल्याबाई होळकर पुलाखालच्या पायऱ्या, वस्त्रांतरगृह, रामकुंड परिसर, पंचवृक्ष क्षेत्र, सितागुंफा परिसर, काळाराम मंदिर, श्रीराम उद्यान, शाही मार्ग, तसेच गाडगे महाराज पुलापर्यंतचा भाग तपासला. या दौऱ्यात त्यांनी पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विविध सूचना दिल्या.
Kumbhmela ; रामकाल-पथ” प्रकल्पासाठी विशेष निर्देश
मनपा आयुक्तांनी “रामकाल-पथ” प्रकल्पाला प्राधान्य देत त्याअंतर्गत लेझर शो, पाण्याचे कारंजे, बोटींग, तात्पुरते वस्त्रांतरगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नो व्हेईकल झोन, नो प्लास्टिक झोन, आणि पार्किंगसारख्या सुविधांच्या विकासावर भर देण्याचे आदेश दिले.
तसेच रामकुंड येथे स्नानासाठी स्वच्छ व योग्य पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने विशेष कामे करण्याच्या सूचनाही दिल्या. रामायणातील विविध प्रसंगांचे भिंतीचित्रे, पुतळे, म्युरल्स, कमानी, दीपस्तंभ, आणि आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे परिसराचे सौंदर्यवर्धन करण्यासाठी प्रकल्प राबवण्याचे ठरवले.
शाश्वत पर्यटनाचा केंद्रबिंदू
नाशिकच्या या ऐतिहासिक व धार्मिक परिसराचा विकास जागतिक स्तरावर “आयकॉनिक पर्यटन स्थळ” म्हणून व्हावा, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
He Pan Wacha : Gangotri Water : गंगोत्रीचे जल थेट घरी: डाक विभागाची घरपोच सेवा