Maharashtra vs Karnataka Dispute – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला असून, बेळगावमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला काळे फासल्याच्या घटनेवर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून, मनसेसह शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि इतर मराठी संघटनांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मनसेचा आक्रमक पवित्रा, कर्नाटकच्या बसेसना काळे फासले (Maharashtra vs Karnataka Dispute )
मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये कर्नाटकाच्या बसेसना काळे फासून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी “जय महाराष्ट्र” असे लिहीत, घोषणाबाजी करत कर्नाटक सरकार आणि कन्नड वेदिका संघटनेचा निषेध करण्यात आला.
मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ठाम भूमिका घेत, “जर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी जनतेवर हल्ले केले, तर त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. हा इशारा गांभीर्याने घ्यावा, अन्यथा त्याचा परिणाम कर्नाटकातील कन्नड भाषिकांवर होऊ शकतो.” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
शिवसेनेचे आंदोलन आणि कोल्हापुरातील संताप
शिवसेनेने कोल्हापुरात कर्नाटकातील बसेस रोखत, बेळगावमधील घटनेचा निषेध केला. पक्षाचे स्थानिक नेते “ही घटना महाराष्ट्राचा अपमान असून, आम्ही शांत बसणार नाही,” असे म्हणाले.
राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता!
या मुद्द्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुढील आदेश काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.