Nashik : गंगापूर रोडवरील सप्तश्रृंगीनगर भागात भरधाव कारच्या धडकेत एका युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. राहुल मधुकर महाजन असे या जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
घटनेबाबत अमोल महाजन (४५, रा. बोधलेनगर) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सरकारवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हा अपघात घडण्यामागचे नेमके कारण आणि संबंधित कारचालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.