पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हे शाखेची कारवाई
Nashik crime news : शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई (Nashik crime news)
कवटेकरवाडीत रचला सापळा
गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार मोटारसायकल चोरीप्रकरणी तपास करीत असताना सपोनि प्रेमचंद गांगुर्डे व पोहवा चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्रीसाठी कवटेकरवाडी, पांडवलेणी परिसरात येणार आहे.
त्यानुसार प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांना माहिती कळवून पोलिसांनी तातडीने सापळा रचला. संशयित इसम मोटारसायकलवर दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
२० वर्षीय आरोपी अटकेत, चोरीची गाडी जप्त (Nashik crime news)
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव नितीन एकनाथ पवार (वय २०, रा. कवटेकरवाडी, मुळगाव झुंगे खेडले, ता. निफाड) असे आहे. त्याच्याकडून २५,००० रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल (MH 15 EN 6476) जप्त करण्यात आली आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस
आरोपीकडून कबुली, पुढील तपास इंदिरानगर पोलिसांकडे
आरोपीने चौकशीत दिलेल्या कबुलीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाईत सहभागी पोलिसांची नावे
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोउपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोउपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संपूर्ण कारवाईमध्ये वरिष्ठ पोनि तृप्ती सोनवणे, प्रभारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि प्रेमचंद गांगुर्डे, पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, पोअंम प्रविण वानखेडे, चापोअंम सुनील खैरनार, मंगेश आव्हाड आणि होमगार्ड सागर काळे यांनी सहभाग घेतला.