Nashik Crime News | संतापजनक ! महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी

mbcMarathiNashik Crime News

Nashik Crime News : वेळोवेळी आक्षेपार्ह मेसेज पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून एकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार शालिमार येथील दुकानात घडला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिस ठाण्यात समीर बागमार (रा. शालिमार) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. (Nashik Crime)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २४ एप्रिल ते ८ मे दरम्यान संशयित समीर बागमारने तिचा विनयभंग केला. व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील संदेश पाठवून व जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय, कामाच्या ठिकाणी स्पर्श केला. त्याला विरोध केला असता, काम चांगले नसल्याची बतावणी करून पगारात ३ हजार रुपयांची कपात केली. त्यानंतरही त्याने शारीरिक संबंधाची मागणी करत दबाव आणला. या त्रासामुळे पीडितेने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असता, समीरने तिला धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद आहे.(Nashik Crime News) या प्रकरणाचा तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत.