Nashik : नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: ५ गुन्हे उघड; ४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

"नाशिक गुन्हे शाखेच्या मोठ्या कामगिरीचे दर्शन घडवणारी घटना, जिथे ५ गुन्ह्यांचा तपास उघड झाला असून ४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे."

Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने उल्लेखनीय कामगिरी करत मोटारसायकल चोरी आणि ४ चैन स्नॅचिंग प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. एकूण ४.८१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग प्रकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली होती. याअंतर्गत, युनिट-२ चे सपोनि राजेंद्र घुमरे आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथे सचिन पाटील (वय २८), आनंदवली, गंगापूररोड, नाशिक अनिल चिंतामणी (वय २९), मूळ रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर, सध्या आनंदवली, नाशिक या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: ५ गुन्हे उघड; ४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींनी बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच-१५ जेएल ९७६५) चोरी केल्याची कबुली दिली असून, सदर वाहनाचा वापर करून सातपूर, आडगाव, आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे मान्य केले आहे.त्यांच्याकडून सोने: ५६.५५ ग्रॅम मोटारसायकल: बजाज पल्सर एकूण रक्कम: ४,८१,४०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

सदर गुन्हे अंबड पोलीस ठाणे – मोटारसायकल चोरीचा गुन्हा सातपूर, आडगाव, उपनगर पोलीस ठाणे – चैन स्नॅचिंग प्रकरणे या ठीके आरोपींनी गुन्हे केले होते.

सदर ऑपरेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुक्तारखान पठाण, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील यांसह संपूर्ण युनिट-२ च्या पथकाने पार पाडले.

हे पण वाचा : Nashik Police : नाशिक पोलीसांची अचानक कारवाई: टवाळखोरांवर कारवाई, ६९,५०० रुपयांचा दंड वसूल