Nashik शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबविण्यासाठी Nasik पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी कडक पावले उचलली असून त्यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाने आज मोठी कामगिरी बजावली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या ४ गायींची पोलिसांकडून सुटका; गुंडा विरोधी पथकाची कारवाई
गोपनीय माहितीवरून सापळा लावला आज रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकास माहिती मिळाली की, म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतून कत्तलीसाठी गायी वाहून नेल्या जात आहेत. तात्काळ या माहितीची दखल घेत पथकाने न्यू नाशिक टोइंगजवळ सापळा रचला. काही वेळाने एम.एच. १५ ई.जी. ३०८५ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ४ गायी आढळल्या.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल वाहन चालक इरफान नुर कुरेशी (२७, रा. वडाळानाका, नाशिक ) याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत वाहन मालक समीर पठाण व खरेदीदार मन्नन कुरेशी, शालम चौधरी आणि आवेश कुरेशी (सर्व रा. नाशिक) यांची नावे समोर आली असून हे तिघेही फरार आहेत. म्हसरूळ पोलीस ठाण्यात या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ लाखांचा मुद्देमाल जप्त कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ गोवंश जातीची गायी, वाहतूक करणारे वाहन यांसह एकूण ४,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गायींना गोशाळेत सुरक्षित सोडण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाईत पोलिसांचा सक्रिय सहभाग या कामगिरीत पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे व सविता कवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे गोवंश जातीच्या जनावरांचे प्राण वाचले असून अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
He Pan Wacha : Nashik : १०६ तोतया वारसदारांच्या मदतीने २ कोटींचा आर्थिक घोटाळा”