नाशिक – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) तिकिट दरवाढीनंतर आता ‘आवडेल तेथे प्रवास’ या सवलत योजनेच्या पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता अधिक खर्च करावा लागणार आहे. नवीन दर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
महामंडळाच्या (MSRTC) ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत प्रवाशांना 4 दिवस आणि 7 दिवसांच्या पास सुविधा मिळते. नव्या दरवाढीनुसार –
4 दिवसांचा पास: प्रौढ प्रवाशांसाठी ₹1814
7 दिवसांचा पास: प्रौढ प्रवाशांसाठी ₹3171
एसटीच्या विविध बस प्रकारांनुसार प्रतिटप्पा दरातही वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना फटका
एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. यापूर्वीच महामंडळाने तिकिट दरात 14.95% वाढ केली होती. त्यातच या पास दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे.