शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
Nashik Traffic Congestion Control : नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह नो पार्किंग क्षेत्रात उभी असलेली वाहने टोइंग करण्याची मोहीम बुधवारपासून (दि.५) राबवली जाणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नियमबाह्य पार्किंगवर कडक कारवाई
शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहनचालकांनी महापालिकेने निर्धारित केलेल्या जागांवरच वाहने उभी करावीत. ‘पे अँड पार्क’ सुविधेच्या व्यतिरिक्त अन्यत्र वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांचा कठोर निर्णय
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानुसार टोइंग कारवाईला सुरुवात होत आहे. शहरात दोन स्वतंत्र कंत्राटदारांद्वारे टोइंग करण्यात येत आहे. सुरुवातीला पोलिस आयुक्तालयाने महापालिकेशी समन्वय साधून अधिकृत पार्किंग स्थळे निश्चित केली आहेत.
कोणत्या भागात होणार टोइंग कारवाई?
टोइंग कारवाईसाठी प्राथमिक टप्प्यात खालील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवली जाणार आहे:
- भद्रकाली
- सरकारवाडा
- मुंबई नाका
- गंगापूर
- नाशिकरोड
- उपनगर
- देवळाली कॅम्प
वाहनतळांची यादी
ऑन स्ट्रीट वाहनतळे (रस्त्यावरील)
- एम.जी. रोड – ९४ दुचाकी, ३१ कार
- सिव्हिल हॉस्पिटल ते जलतरण तलाव – ६७ दुचाकी, २५ कार
- सीबीएस ते शालीमार – १३५ दुचाकी, २७ कार
- गाडगे महाराज पुतळा ते टाळकुटेश्वर – ८१ कार
- मॉडेल कॉलनी चौक ते भोंसला कॉलेज – ९५ दुचाकी, १५ कार
ऑफ स्ट्रीट वाहनतळे (रस्त्याबाहेरील)
- बी. डी. भालेकर मैदान – २०८ दुचाकी, १५६ कार, ५ बस
- संत गाडगे महाराज पुतळा परिसर – ११२ दुचाकी, १७ तीन चाकी, १२६ कार, १० सहा चाकी
- आगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर – ६३ दुचाकी, १५ कार
दंड शुल्क किती?
टोइंग झालेल्या वाहनांसाठी ठरवलेले दंड शुल्क खालीलप्रमाणे असेल:
- दुचाकी – ७०० ते ७३६ रुपये
- कार – ९७२ ते १०४९ रुपये
- तीन चाकी (रिक्षा) – ६०० ते ८०० रुपये
कारवाईची प्रक्रिया कशी असेल?
- ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देण्यात येणार.
- कारवाईचे सीसीटीव्ही व व्हिडिओ शूटिंग केले जाणार.
- वाहन चालक दंड भरण्यास तयार असल्यास जागेवरच दंड आकारला जाईल.
- शासकीय व लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही कारवाई करण्यात येईल.
पोलिस उपायुक्तांचा संदेश
“शहरात नेमून दिलेल्या वाहनतळांवरच वाहने लावावीत. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास टोइंग कारवाई केली जाईल.”
- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा