Ranveer Allahbadia: इंडियाज गॉट लेटेंट शो प्रकरण: रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांनी सायबर सेलसमोर नोंदवला जबाब

India’s Got Latent Controversy: Ranveer Allahbadia and Ashish Chanchlani Record Statements Before Cyber Cell

Ranveer Allahbadia : इंडियाज गॉट लेटेंट (India’s Got Latent) या शोमधील वादग्रस्त आणि अश्लील कमेंट्स प्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) आणि आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) यांनी आज महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्यालयात हजर राहून आपले जबाब नोंदवले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) चर्चेत का?

इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) मोठ्या वादात सापडला आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, अनेकांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स

विवाद वाढल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने रणवीरला (Ranveer Allahbadia) चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सायबर सेल रणवीरशी (Ranveer Allahbadia) संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती, पण तो प्रतिसाद देत नव्हता, असे बोलले जात होते. अखेर रणवीरने आज मुख्यालयात हजर राहून जबाब नोंदवला.

सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात रणवीरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला अटकपूर्व दिलासा देत, चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

2 तास चौकशी, 40 जणांना समन्स

या प्रकरणात सायबर सेलने आतापर्यंत 40 जणांना समन्स पाठवले असून, 5 जणांचे जबाब नोंदवले आहेत. रणवीर आणि आशिष यांची सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली.

माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न

चौकशीनंतर रणवीर अलाहाबादिया बाहेर आला, मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून त्याने तोंड लपवले आणि गाडीत जाऊन बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.