Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा संताप | महिला सन्मानासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

प्राजक्ता माळी पत्रकार परिषद

प्राजक्ता माळीने prajakta Mali महिला कलाकारांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुरेश धस यांच्या आक्षेपार्ह विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मुंबई: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या prajakta Mali नावाचा वापर करून करण्यात आलेल्या विधानांमुळे वादाला वेगळे वळण मिळाले आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

प्राजक्ता माळीने स्पष्टपणे सांगितले की, “महिला कलाकारांच्या नावाचा राजकीय वादांत गैरवापर होऊ नये. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजिरवाणे आहे.” तिने धस यांच्याकडून जाहीर माफीची मागणी केली असून, त्यावर ठोस कारवाई न झाल्यास पुढील भूमिका घेण्याचा इशाराही दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट व तक्रार

प्राजक्ता माळीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि तक्रारीचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी तिच्या सन्मानाला बाधा येईल असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

“यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओंवर कठोर कारवाई केली जाईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

प्राजक्ता माळीचा संताप

पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, “कलाकार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, हे माझे कर्तव्य आहे. मात्र, काही नेते महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. हे कृत्य निंदनीय असून, महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाहीत, असा समज दाखवणाऱ्या मानसिकतेचा मी निषेध करते.”

सुरेश धस यांचे वादग्रस्त विधान

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चर्चेदरम्यान सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह काही महिला कलाकारांचे नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. यावरून प्राजक्ता माळीने समाजासमोर धस यांना जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

महिला कलाकारांवर अन्याय थांबवण्याचा आग्रह

या प्रकरणावरून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, “महिलांच्या सन्मानावर आघात करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा विरोध केला जाईल. राजकारणासाठी महिला कलाकारांचा वापर होता कामा नये.”

He Pan Wacha : OBC : ओबीसींच्या नाराजीसाठी 10 दिवसांत तोडगा: फडणवीसांचा शब्द”