नांदगावला कळवाडी गटात समीर भुजबळांची बैलगाडीतून रॅली

Sameer Bhujbal's bullock cart rally in Kalwadi group to Nandgaon

विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार समीर भुजबळ यांचे पारडे जड होतांना दिसत आहे. भुजबळ यांनी आपल्या समर्थकांसह कळवाडी गटात प्रचार रॅली काढली. या रॅलीत त्यांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ‘भयमुक्त
नांदगाव, प्रगत नांदगाव’ करण्यासाठी समीर भुजबळ यांना विविध संस्था संघटनाकडून पाठिंबा मिळत असून नांदगाव मतदारसंघात विकासाची शिट्टी वाजणार असा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे. समीर भुजबळ यांनी आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी गटातील विविध गावांना भेटी दिल्या. यादरम्यान त्यांचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत केले. तर दहिवळ येथे सजविलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढत त्यांना खांद्यावर घेऊन नागरिकांनी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला. यावेळी
निळया टोप्या, मफलर परिधान केलेले व निळे झेंडे हाती घेतलेले ग्रामस्थ रॅलीच्या अग्रभागी होते.
नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमाणिका नंबर ९ च्या समोरील शिट्टी या निशाणीवर आपले बहुमोल मत देऊन मला भरघोस आशीर्वाद द्यावे, असे आवाहन समीर भुजबळ यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी दिगंबर पवार, वैभव पवार, पुरुषोत्तम गांगुर्डे, सचिन पवार, गोकुळ पवार, सोमनाथ वाघ, श्रीकांत साळुंखे, भारत गांगुर्डे, ऋषिकेश पवार, बापू पवार, नितीन पवार, कैलास पवार यांच्यासहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. येथील वीर एकलव्य ग्रुपचे ज्ञानेश्वर दळवी, दिनेश दळवी, काशिनाथ दळवी, चैत्राम दळवी, राजू दळवी, विजय दळवी, सुरेश दळवी, देवीदास दळवी, राजू दळवी, विशाल दळवी, राहुल दळवी, दादाजी दळवी, लखन दळवी, मोहन दळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी समोर येऊन भुजबळ यांना पाठिंबा दिला. तसेच गिगाव येथील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर जाधव यांनी समीर भुजबळ यांच्या गटात प्रवेश करीत त्यांना पाठिंबा दिला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.