छत्तीसगडमध्ये 38 नक्षलवाद्यांचा खात्मा

38 Naxalites Killed

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील नांदूर जंगलात घडलेल्या मोठ्या चकमकीत 38 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. माहिती मिळाली होती की नक्षलवाद्यांचा प्रशिक्षण कॅम्प या जंगलात सुरु आहे, आणि त्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलिसांनी या कारवाईत AK-47, इंसास रायफल्स आणि इतर शस्त्रास्त्रांसह नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे.

छत्तीसगड पोलिसांनी कोणताही मनुष्यहानी न होण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. अजूनही जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून, परिसरात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Leave a Reply