नाशिक | MBC Marathi प्रतिनिधी
नाशिक शहरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी MNGL कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेत पाचारण केले.
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाइपलाइन कामामुळे रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या खोदकामामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने कंपनीला कामावर लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नागरिकांमधून चारपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पाइपलाइन निर्माण झालेली असून आगामी काळात शहरातील नागरिकांना गॅस जोडणी देण्यासाठी खोदकाम आवश्यक असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. खोदकामाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे नमूद आहे.
MNGL ने शहरात सुमारे 180 किलोमीटर लांबीची गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी महापालिकेकडे 110 कोटी रुपये जमा केल्याचे वृत्तात म्हटले आहे.