December 19, 2024 : “आजचा शुभवेध”

Here is the horoscope-themed design for December 19, 2024, inspired by the celestial and zodiac symbols with auspicious colors and keywords. Let me know if you need adjustments!

Rashibhavishya गुरूवार, December 19, 2024. मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3

December 19, 2024 : “आजचा शुभवेध” “आज संध्याकाळी 7 वा नंतर चांगला दिवस”

December 19, रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तुमच्यावर रवी आणि गुरु या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व धाडसी व जोशपूर्ण असते .स्वतःच्या मर्यादा बाहेर जाऊन दुसऱ्याला मदत करायला आवडते. दुसऱ्याची गुपिते तुम्ही स्वतः जवळच ठेवतात, त्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास असतो. विविध खेळात तसेच संगीतात प्रवीण असतात. झटपट निर्णय व त्वरित कृती हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. स्वतंत्र बाणा व दुराग्रही वृत्ती यामुळे इतरांचे इतरांबरोबर सहकार्य करणे तुम्हाला कठीण जाते. तुमचे विचार तुम्ही लिखाणातून अधिक प्रभावीपणे मांडू शकता. त्यामुळे चांगले लेखक म्हणून प्रसिद्धी मिळते. तुमचा जन्म चांगल्या व सुस्थितीत असलेल्या घराण्यात झालेला असतो .इतरांना ज्या सुखसोयी फार उशिरा उपलब्ध होतात, त्या तुम्हाला लहानपणीच उपभोगायला मिळण्याची संधी मिळते .एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे हुशार असूनही शिक्षणात व्यत्यय येतो .बऱ्याच वेळा तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते .सतत कामात राहिल्यासच तुम्ही स्थिर होऊ शकतात . इतरांच्या मनाने तुमचे राहणीमान उच्च दर्शनाचे असते. तुम्ही जितके श्रीमंत आहात त्यापेक्षा तुम्ही अधिक श्रीमंत आहात अशी इतरांची कल्पना होते. तुमची खर्चिक वृत्ती असते. घरात सर्व सुख सोयी असाव्यात, नाविन्यपूर्ण वस्तू संग्रही असाव्यात असे तुम्हाला वाटते. पुस्तकांची आवड असल्याने बराच पैसा साहित्यावर खर्च होतो .तुम्ही मान आणि प्रतिष्ठा या गोष्टीला अधिक महत्त्व देतात. तुमच्या स्वभाव महत्त्वकांक्षी असून अनेक गोष्टीत रस असतो .भाषा चातुर्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर छाप पडतात. तुम्ही स्वतंत्र विचाराचे ,वृत्तीचे असतात. कलेबद्दल आकर्षण असून त्यात उत्साहाने भाग घेतात. बुद्धिमान असून तत्त्वज्ञान तुम्हाला प्रिय विषय आहे .सतत कामात मग्न राहणे आवडते .त्रयस्थ भूमिकेतून इतरांना उत्तम सल्ला देता. मैत्रीमध्ये आणि व्यवसायामध्ये अनेक वेळा बदल घडतात. तुम्ही सभ्य निस्वार्थी व विशाल दृष्टिकोनाचे आहात. इच्छाशक्ती दांडगी असून कोणत्याही विषय चांगल्या तऱ्हेने समजून घेतात. मित्रांशी नातेवाईकांशी प्रामाणिक राहून अनेक जबाबदाऱ्या पार पडतात .जीवनामध्ये शिस्त असावी हा विचार तुम्ही कडकपणे पाळता. उदार मनाच्या असल्या तरी पैशाचे काळजीपूर्वक नियोजन करतात. कोणत्याही प्रकारच्या समाजात तुम्ही झटकन मिसळता. हुशार व बुद्धिमान शेजाऱ्यांशी तुमचे उत्तम जमते. तुमचे जीवन समाधानी व सुखी असते. इतरांच्या मार्गाने तुमचे राहणीमान वरचे दर्जाचे असते. तुम्ही जितके श्रीमंत आहात त्यापेक्षा तुम्ही अधिक श्रीमंत आहात अशी इतरांची कल्पना होते .घरात सर्व सुख सोयी असाव्यात व नावीन्यपूर्ण वस्तुसंग्रह असावा असे तुम्हाला वाटते .तुमच्याकडे डामडौल असून खर्चिक वृत्ती असते. तुम्हाला आरामशीर जीवनाची आवड असून घरातली सजावट खर्चिक पद्धतीने केलेली असते. तुम्ही हुशार दिसायला सुंदर असतात नृत्य व संगीताची आवड असते. तुम्ही तुमच्या पतीला उत्तम साथ देतात. तुमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ जास्त असते .आपला साथीदार आपल्यासारखाच उत्साही, सौंदर्य प्रेमी कपड्यांची आवड असणारा घरात व समाजात मिसळण्याची आवड असणारा असावा असं वाटते . बुद्धिमत्ता महत्वकांक्षा व प्रतिष्ठा व प्रामाणिकपणा अशा गुण असलेल्या व्यक्तींकडे तुम्ही ओढले जातात.

December 19, 2024 : "आजचा शुभवेध"

शुभ रंग -पिवळा, सोनेरी जांभळा.

शुभ दिवस :-सोमवार, रविवार गुरुवार .

शुभ रत्ने:- माणिक पाचू पुष्कराज.

( रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली तपासा )

आजचे राशिभविष्य December 19, 2024 : “आजचा शुभवेध”

मेष:- आज गृह सौख्याचा दिवस.घरगुती कामात व्यस्त रहाल.

वृषभ:- आज काहीतरी शुभ घटना घडण्याचा कालावधी आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

मिथुन:- आज उत्तम पदार्थांचा आस्वाद घ्याल.नोकरी व्यवसायात छान वातावरण राहील.

कर्क:- आज उत्तम दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व सहलीला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल.

सिंह:- आज व्यय स्थानात चन्द्र आहे.मेहनतीच्या मनाने लाभ कमी असतील.आरोग्य जपा.

कन्या:- आज पती, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. रम्य ठिकाणी पर्यटन कराल .लाभदायक काळ आहे.

तुळ:- आज अंदाज बरोबर ठरतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.सहकारी मदत करतील.

वृश्चिक:- आज तीर्थयात्रा घडतील.परदेशी प्रवासाची संधी चालून येईल.

धनु:- आज अष्टमात चन्द्र आहे.रुटीन चालू ठेवा.कामात नीती ने वागा. आरोग्यविषयक तक्रारी राहतील.

मकर:- आज स्नेही मंडळी सोबत सहली,शुभ कार्यात रमाल .सामाजिक क्षेत्रात पुढाकार घ्याल.

कुंभ:- आज अनपेक्षित लाभ होतील.मनस्वास्थ चांगले राहील.शत्रू पराभूत होतील.सामजिक मान, प्रसिद्धी लाभेल.

मीन:- आज साहित्य,लेखन कला बहरेल. शैक्षणिक यश मिळेल. मंत्र सिद्धी प्राप्त होईल.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

He Pan Wacha : Maharashtra : उत्तरेतील वारे; महाराष्ट्र गारठला!