नाशिक शहरात डेंग्यूचे ३१ रुग्ण; धूर फवारणी तात्पुरती बंद, औषध फवारणीवर भर

नाशिक शहरात डेंग्यूचे ३१ रुग्ण आढळले. महापालिकेने धूर फवारणी तात्पुरती बंद करून औषध फवारणी सुरू केली. संपूर्ण बातमी वाचा.

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून यंदाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३१ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने डेंग्यू नियंत्रणासाठी औषध व धूर फवारणीचे नियोजन केले होते. मात्र औषध फवारणीसाठी वापरले जाणारे औषध उपलब्ध झाल्याने धूर फवारणी सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शनिवार (१ ऑगस्ट) पासून शहरातील पूर्व, पश्चिम, नाशिक रोड आणि पंचवटी विभागात डेंग्यू प्रतिबंधक औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धूर फवारणीपेक्षा औषध फवारणी अधिक प्रभावी असल्याने त्यावर भर देण्यात येत आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती होऊ न देणे आणि ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.