Rashibhavishya माघ पौर्णिमा | उत्तरायण | शिशिर ऋतू | क्रोधीनाम संवत्सर
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ: दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
विशेष: माघ स्नान समाप्ती
चंद्रनक्षत्र: आश्लेषा (संध्याकाळी ७.३६ नंतर मघा)
आज जन्मलेल्या बाळाची राशी:
- सकाळी ७.३६ पर्यंत – कर्क
- संध्याकाळी ७.३६ नंतर – सिंह
ग्रहस्थिती:
- (मकर) रवी प्रतियुती (कर्क) चंद्र
- (कर्क) चंद्र केंद्र (मेष) हर्षल
- (सिंह) चंद्र प्रतियुती (कुंभ) बुध
आजचा दैनिक राशीफल: Rashibhavishya
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्राचा रवी आणि हर्षलशी अशुभ योग आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. शेती व्यवसायात माफक लाभ. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक लाभ संभवतात, पण मोठे व्यवहार टाळावेत. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. संयम बाळगा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. परोपकार करा. आत्मविश्वास कमी होऊ शकतो, म्हणून सकारात्मक राहा.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र तुमच्या राशीत आहे. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने साकार होतील. फार मोठे निर्णय टाळावेत.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
आजचा दिवस प्रतिकूल आहे. आध्यात्मिक लाभ होतील. मेहनत वाढेल, पण लवकरच परिस्थिती सुधारेल.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
दिवसाची सुरुवात चांगली होईल. मनासारखी कामे होतील. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी खर्च वाढेल.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आर्थिक लाभ संभवतात. नोकरीत नवीन संधी मिळतील. सामाजिक संपर्क जपावा लागेल.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. शत्रूंपासून सावध राहा.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
महत्त्वाची कामे पुढे ढकला. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. दानधर्म करण्यास चांगला दिवस.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संमिश्र दिवस आहे. संयम ठेवा. संततीकडून चांगली बातमी येईल. मनःस्थिती थोडी अस्थिर राहील.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
आर्थिक फायदा संभवतो. व्यवसाय वाढेल, पण मनःशांती कमी होईल. मोठे निर्णय पुढे ढकला.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. मौल्यवान वस्तू सांभाळा, नुकसान टाळा.
Rashibhavishya ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक : 8087520521