Manikrao kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे दोषी ठरले; पद धोक्यात, सत्र न्यायालयात स्थगिती अर्ज सोमवारी

Manikrao kokate

Manikrao kokate: राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) आणि त्यांच्या भावाला फसवणूक प्रकरणी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांच्या मंत्रिपदावर संकट आले आहे. शिक्षेपासून दिलासा मिळवण्यासाठी कोकाटे सोमवारी (दि. २४) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती अर्ज करणार आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Manikrao kokate: कोकाटे बंधूंवर फसवणुकीचा आरोप

१९९७ मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी अॅड. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी खोटी माहिती दिली होती. त्यांनी स्वतःच्या नावे कोणतीही मिळकत नसल्याचे दर्शवून लाभ मिळवला. तसेच, अन्य दोन लाभार्थ्यांच्या सदनिकाही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

न्यायालयाचा निकाल आणि शिक्षेचा फटका

सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर न्यायालयात खटला चालवण्यात आला. २० फेब्रुवारीला अंतिम सुनावणीत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी २ वर्षे कारावास आणि ५०,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आले असून कायदेतज्ज्ञ यावर मतभेद व्यक्त करत आहेत.

Manikrao kokate : शिक्षेची स्थगिती मिळणार का?

सद्यस्थितीत शिक्षेवर स्थगिती मिळाल्यासच कोकाटे (Manikrao kokate) मंत्रीपदावर राहू शकतील. त्यामुळेच त्यांनी तातडीने सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी केली आहे. सोमवारी (दि. २४) त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार असून न्यायालयाचा निकालच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय करणार आहे.

राजकीय आणि कायदेशीर दृष्टीकोन

कोकाटे यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळाली तर त्यांचे मंत्रीपद अबाधित राहू शकते, अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. हा खटला राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला असून विरोधकांकडून त्यांच्यावर तीव्र टीका केली जात आहे. आता त्यांच्या अपिलावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.