संसारी येथील तानाजी शिवाजी गोडसे यांच्या शेतात पिंजऱ्यामध्ये सापडलेल्या बिबट्या मादीची तीन पिल्ले पिंजऱ्या बाहेर परिसरात राहिली होती. ती शोधून वाचविण्यात वन विभागाला यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंगेश विनायक गोडसे यांच्या शेतात हे पिल्ले होती. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक पवन निकम,शरद थोरात व संतोष बोडके,अशोक खानजोडे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी दहा सदस्यांची रेस्क्यू टीम पाठवली.
संसरी आणि शेवगे दारणा येथील सहकाऱ्यांच्या मदतीने या टीमने वाढलेल्या मोठ्या गवतातील पिल्लांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर तिन्ही पिल्लांना तपासणीसाठी दवाखान्यात नेण्यात आले.
वेळेत दखल घेऊन पिल्लांचे प्राण वाचवल्याबद्दल वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे आणि सर्व सहकाऱ्यांचे गावकरी अनिल गोडसे,विजय गोडसे , विनोद अण्णा गोडसे ,तानाजी शिवाजी गोडसे,विष्णू ठाकरे ,सुनील गोडसे
,गणेश गोडसे ,मंगेश गोडसे,
संतोष गोडसे ,भाऊसाहेब गोडसे,दत्तू गोडसे आदींनी आभार मानले.
#NashikNews #WildlifeRescue #LeopardCubs #ForestDepartment #AnimalRescue #Sunsari #NashikWildlife #PositiveNews