अंबड-लिंक रोडच्या दुरवस्थेमुळे बळी गेल्याचा आरोप; अपघात Accident सीसीटीव्हीत कैद
नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडच्या दुरवस्थेमुळे आणखी एका निष्पाप दुचाकीस्वाराचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी (दि. २५) दुपारी दुचाकीस्वार पेंटरच्या बळी घेतला. चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात Accident सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मयताचे नाव जगताप (वय ४०, रा. श्रमिकनगर) असे असून ते पेंटर म्हणून व्यवसाय करत होते. मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून प्रवास करत होते. त्याचवेळी चिखलमय रस्त्यावरून दुचाकी घसरल्याने ते खाली कोसळले.
याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली ते सापडले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप
सातपूर-अंबड लिंक रोडच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून अनेक दिवसांपासून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचणे, खड्डे आणि रस्त्याची अपुरी देखभाल यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
मयताच्या नातेवाईकांनीही रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावला
या अपघातात जगताप यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ते पेंटर म्हणून व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि बहीण असा परिवार आहे.
सलिम शेख, मनसे प्रदेश उपाध्यक्ष यांनी या अपघाताबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत रस्त्याच्या दुरवस्थेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. अंबड-लिंक रोडकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे त्यांनी म्हटले. मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर घसरल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्याचे दिसत आहे. अपघातानंतरचे हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
या घटनेमुळे सातपूर-अंबड लिंक रोडच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.