Stock Market Today: एक्सपायरीच्या दिवशी बाजारात मोठी चढ-उतार; FIIs-DIIs ची खरेदी, सोने-चांदीत जोरदार तेजी

Stock Market : मंथली एक्सपायरीच्या दिवशी मंगळवारी भारतीय शेअर Stock Market बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी घसरला, तर निफ्टी 24,000 च्या खाली आला. मात्र, काही वेळातच बाजाराने रिकव्हरी करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला. सकाळी 9:26 वाजेपर्यंत सेन्सेक्स 66 अंकांच्या घसरणीसह 76,422 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 11 अंकांनी घसरून 24,020 च्या आसपास पोहोचला. बँक निफ्टीनेही सुरुवातीची कमजोरी झटकत 83 अंकांची वाढ नोंदवली आणि 55,375 वर व्यवहार सुरू केला.

Stock Market कोणते शेअर्स राहिले चर्चेत?

निफ्टी 50 मधील काही दिग्गज शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसून आली. Indigo, Titan, Max Healthcare, UltraTech Cement, M&M आणि ICICI Bank या शेअर्समध्ये घसरण झाली. तर SBI, Nestle, BEL, Coal India, TCS, Infosys, ONGC, Wipro, Tech Mahindra आणि HCL Tech यांनी बाजाराला आधार दिला.

सेक्टोरल इंडेक्समध्ये संमिश्र चित्र Stock Market

FMCG, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रात किरकोळ घसरण दिसली. मात्र, आयटी, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून आला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही संमिश्र व्यवहार झाले. एकूण बाजाराचा मूड मात्र 63 टक्के ‘बुलिश’ राहिला.

Stock Market बाजारावर कोणत्या घटकांचा प्रभाव?

आज देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींचा बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

  • केंद्र सरकारकडून कॅपिटल गेन टॅक्स आणि गोल्ड मॉनेटायझेशन संदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इराणसोबतची चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले असले तरी मध्यपूर्वेतील तणाव कायम.
  • कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता.
  • सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ.
  • FIIs आणि DIIs कडून मोठ्या प्रमाणात खरेदी.

क्रूड ऑईलमध्ये मोठा चढ-उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. सोमवारी तेलाचे दर जवळपास 5 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, अमेरिकेकडून काही इराणी जहाजांवर कारवाई झाल्याच्या वृत्तानंतर ब्रेंट क्रूड पुन्हा 2 टक्क्यांनी वाढून 98 डॉलरच्या आसपास पोहोचले. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी हा मोठा चिंतेचा विषय मानला जात आहे.

सोने-चांदीत विक्रमी तेजी

जागतिक तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. चांदीच्या किंमतींमध्ये तब्बल ₹4,800 ची वाढ झाली असून ती ₹2,76,400 वर बंद झाली. तर सोन्याच्या किंमती सुमारे ₹400 ने वाढून ₹1.59 लाखांच्या वर गेल्या.

दरम्यान, CRISIL आणि World Gold Council यांच्या अहवालानुसार आगामी काळात भारतातील सोन्याची मागणी 10 वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

FIIs आणि DIIs ची जोरदार खरेदी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग चार दिवसांच्या विक्रीनंतर सुमारे ₹4,900 कोटींची नेट खरेदी केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) देखील ₹3,856 कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला.

कॉर्पोरेट निकालांवर बाजाराचे लक्ष

Hitachi Energy कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. RVNL चे निकाल संमिश्र राहिले, तर CONCOR चे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत ठरले. आज बाजाराचे लक्ष ONGC आणि Siemens यांच्या निकालांकडे लागले आहे.

ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी SEBI चा नवा प्रस्ताव

Securities and Exchange Board of India ने ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये इंट्राडे नवीन स्ट्राइक प्राइस जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे ट्रेडर्सना बाजारभावाजवळील ऑप्शन्स उपलब्ध होऊ शकतात आणि व्यवहार अधिक लवचिक होण्याची शक्यता आहे.

IIP ची नवी सिरीज जूनपासून लागू

केंद्र सरकार जूनपासून औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) ची नवी सिरीज लागू करणार आहे. यात 2022-23 हे बेस इयर असणार असून गॅस, वॉटर सप्लाय आणि रेअर अर्थ क्षेत्रांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाचा अधिक व्यापक आणि अचूक अंदाज मिळणार आहे.